स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत मांजरवाडी Smart Village Manjarwadi Grampanchayat
मांजरवाडी ग्रामपंचायत ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी आधुनिक आणि प्रगत ग्रामपंचायत आहे. गावातील नागरिकांना स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा आणि डिजिटल सेवा उपलब्ध करून देणे हे ग्रामपंचायतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. Manjarwadi Grampanchayat is a modern village council dedicated to the overall development of the village. It works to provide clean environment, water supply, roads, healthcare facilities and digital services to all citizens of the village.
0
लोकसंख्या Population
0
पुरुष Gents
0
महिला Women
0
स्वच्छ गाव (%) Clean Village (%)
मांजरवाडी गावाची माहिती About Manjarwadi Village
उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अर्थात शिवजन्मभूमीतील आग्नेय कोपऱ्यातील एक छोटसं गाव, मांजरवाडी. साधारणतः तीन हजार लोकसंख्या असलेले हे गाव शेती आणि मातीशी निष्ठा आणि प्रामाणिक राहून येथील शेतकऱ्यांनी आपली कृषी संस्कृती टिकवून ठेवलेली आहे. खरंतर मूळचे खोडद या गावची ही मांजरवाडी ९ नोव्हेंबर १९७० साली स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली आणि या गावाला गावपण आलं. तत्कालीन परिस्थितीमध्ये दुष्काळी भाग, प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये गावातील तत्कालीन कारभारी मंडळींनी या गावाला एक वैचारिक बैठक निर्माण करून देण्याचे काम केले आणि तदनंतर गावच्या विकासासाठी कटिबद्ध होऊन राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व ग्रामस्थांनी गावचा विकास साधण्याचा प्रयत्न केला.
ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर अनेक बुजुर्ग मंडळींनी ग्रामपंचायत च्या माध्यमातून गाव कारभारी म्हणून या गावाच्या विकासामध्ये आपले योगदान दिलेले आहे खरं तर महाराष्ट्राच्या मातीतील लोककला अर्थात तमाशासृष्टीमध्ये कै पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या नावाने प्रसिद्ध असलेले लोकनाट्यकार याच गावचे. या गावची द्राक्षे, टोमॅटो, तरकारी अशा अनेक शेती उत्पादनांच्या माध्यमातून हे गाव प्रसिद्ध पावलेले आहे. तसेच संपुर्ण भारतात लोडिंग अनलोडिंग काँट्रॅक्टरांचे गाव म्हणू या गावची ओळख आहे.
१९९६ साली गावामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना मा. नामदार साबीरभाई शेख, तत्कालीन कामगारमंत्री यांच्या माध्यमातून राबविण्यात आली. खरंतर पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असताना त्या काळामध्ये ग्रामीण भागातील फिल्टरेशन प्लांट असलेली ही एकमेव पाणी योजना होती व आहे त्या नंतर डिंभे धरणाचे पाणी या गावाला मिळाल्यानंतर शेतीचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला.
आज या गावातील असलेल्या ओढ्यांवर छोटे छोटे बंधारे बांधून पाणी आडवा, पाणी जिरवा या माध्यमातून पाण्याचे योग्य नियोजन करून आज उत्तम पद्धतीने शेतकरी आपली उपजीविका करत आहेत. गाव जरी लहान असले तरी या गावामध्ये धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक वातावरण चांगल्या पद्धतीने ग्रामस्थांनी टिकऊन ठेवलेले आहे. गावचे ग्रामदैवत आई मुक्ताई यात्रोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, छत्रपती शिवाजी महाराज जयंती,नवरात्र उत्सव ,सामूहिक विवाह सोहळा असे अनेक उपक्रम या गावातील ग्रामस्थ एकोप्याने करत असतात.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुतळे एकत्र असलेले कदाचीत मांजरवाडी हे गाव महाराष्ट्रात एकमेव असावे. मांजरवाडी गावात गटारी अमावास्या या दिवशी नागरिक व तरुणांसह कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कडेच्या गटारामध्ये झाडे लावण्याचा नाविन्य उपक्रम राबवला जातो. ग्रामपंचायतच्या माध्यमातून शंभर टक्के कर वसुली मागील पंधरा वर्षापासून सतत होत असते आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनामार्फत किंबहुना भारत सरकार मार्फत ग्रामविकासासाठी जी स्पर्धात्मक अभियानं घेतले जातात त्यामध्ये या गावाचा सतत वरचा क्रमांक टिकून आहे. या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय या शालेय संस्थांमधील विद्यार्थ्यांनी देखील स्कॉलरशीप, क्रीडास्पर्धा,स्पर्धापरीक्षा व इतर सर्व शालेय उपक्रमांमध्ये शाळेच्या व गावाच्या नावलौकीकत भर टाकण्याचे काम केले आहे.
गावाला 2008 साली निर्मल ग्राम हा केंद्र सरकारचा मानाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे तसेच राज्य सरकारचा पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम, एक गाव एक गणपती,स्मार्ट व्हिलेज,आरोग्य उप केंद्र,प्राथमिक शाळा या संस्थांना देखील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. गावात शेतकऱ्यांना शेतीसाठी सेवा देण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटी,दूध उत्पादक संस्था,प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेज तसेच पतपुरवठा करणेसाठी पतसंस्था कार्यरत आहेत. या सर्व संस्था गावच्या विकासामध्ये मोठ्या ताकदीने सहभागी होऊन शाश्वत व रचनात्मक विकासासाठी कटिबद्ध आहेत.
ज्ञानोबारायांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे नगरेची रचावी ! जलाशये निर्मावी ! महावने लावावी ! नानावीध !! या अभंगप्रमाणे गावामध्ये अनेक जलाशये निर्माण करून आणि ठीकठिकाणी वृक्ष लागवड करण्याचे काम देखील ग्रामस्थांच्या वतीने सतत होत असते.
गावामध्ये नशाबंदी, कुऱ्हाड बंदी,फ्लेक्स बंदी व डीजे बंदी लागू आहे. ग्रामपंचायत च्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचे व आरोग्याचे त्याचप्रमाणे शिक्षण आणि संस्काराचे महत्त्व समजावून देऊन गावातील एकोपा आणि बंधुता कायम ठेवण्याचे काम केले जाते लोकसहभागातून लोकशाही पुढे नेण्याचे काम आणि गावातील प्रत्येक नागरिकाला व गावाला आत्मनिर्भर करण्याचे काम ग्रामपंचायत च्या माध्यमातून सतत सुरू आहे.
Manjarwadi is a small village located in the southeastern corner of Junnar taluka in Pune district, the land of Shivaji Maharaj’s birth. With a population of around three thousand, the farmers of this village have preserved their agricultural culture with dedication to farming and the soil. Originally part of Khodad village, Manjarwadi became an independent Gram Panchayat on 9 November 1970, giving the village its own administrative identity. During earlier times the village faced drought conditions with no drinking water and no irrigation. The village leaders of that time created a strong vision for development and villagers united beyond political differences to develop the village.
After the establishment of the Gram Panchayat many senior villagers contributed significantly to the development of the village. The village is also known for folk art; the famous playwright Pandurang Mule Manjarwadikar from the Tamasha folk theatre tradition belonged to this village. The village is well known for agricultural products such as grapes, tomatoes and vegetables. Across India the village is also recognized as a hub for loading and unloading contractors.
In 1996, a drinking water scheme was implemented in the village through the efforts of Honorable Sabirbhai Sheikh, the then Labour Minister. At that time there was severe water scarcity, yet this scheme had a filtration plant, making it one of the rare rural water schemes with such facilities.
Later, when water from the Dimbhe dam reached the village, agriculture saw major development. Small check dams were constructed across local streams for water conservation under the concept of “Water Conservation and Recharge”, enabling farmers to sustain their livelihoods efficiently. Though the village is small it maintains strong religious, social and educational traditions. Major festivals celebrated collectively include the Muktaai Yatra festival, Akhand Harinam Saptah, Shivaji Maharaj Jayanti, Navratri festival and community marriage ceremonies.
Manjarwadi may be the only village in Maharashtra where statues of Chhatrapati Shivaji Maharaj and Mahatma Gandhi stand together. The Gram Panchayat has maintained 100% tax collection for the last fifteen years, helping the village achieve top rankings in various development competitions organized by the Maharashtra Government and Government of India. Students from the Zilla Parishad Primary School and Secondary School have achieved recognition in scholarships, sports competitions and academic activities.
The village received the prestigious Nirmal Gram award from the Government of India in 2008. It has also received state awards such as Environment Balanced Prosperous Village, One Village One Ganpati and Smart Village. Various institutions such as cooperative societies, milk producer organizations, precooling cold storage units and credit societies support farmers and contribute to village development.
Inspired by Sant Dnyaneshwar’s abhang about building cities, reservoirs and forests, villagers continuously work on water bodies and tree plantation.
The village strictly follows bans on alcohol, axes, flex banners and DJs. Through the Gram Panchayat the importance of cleanliness, health, education and values is promoted while maintaining unity among villagers and working towards a self-reliant village.
ऐतिहासिक वैभव : रस्त्याच्या मध्यभागी असलेले कडूलिंबाचे झाड म्हणजे मांजरवाडी गाव ! ही मांजरवाडी गावाची परिसरातील ओळख आहे. मांजरवाडी गावाला सांप्रदायिक, भक्तीचा, ऐतिहासिक भक्तीचा तसेच देशप्रेमाचा ही वारसा आहे. गावामध्ये जगदंबा मातेचे जागृत देवस्थान आहे. तसेच पारंपारिक मारुती मंदिर, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर ही सांप्रदायिक ओळख आहे. गावात शेरणी, पालखी, छबिना मिरवणूक यात पारंपारिक मर्दानी लेझीम खेळाचा वारसा तरुणांना पूर्वजांकडून मिळालेला आहे. दत्त जयंती, हनुमान जयंती, श्रीराम जन्मोत्सव, शिर्डीवारी, आळंदी वारी यात भक्तिभावाने ग्रामस्थ सहभागी होत असतात. काकड आरती काकड्याची अनेक वर्षाची परंपरा गावाला लाभलेली आहे. आषाढी वारी पायी दिंडी सोहळा साजरा केला जातो.
स्वातंत्र्य काळात गावातील तरुणांचे योगदान राहिले आहे. चले जाव आंदोलन किंवा स्वातंत्र्य संग्रामात गावातील तरुण महात्मा गांधीजींच्या विचारांनी देशसेवेसाठी सज्ज झालेला होता. त्यांच्या निधनानंतर तरुणांनी त्यांचा पूर्णाकृती पुतळा गावाच्या मुख्य चौकात बसविलेला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पुतळा असलेले उत्तर-पुणे जिल्ह्यातील मांजरवाडी एकमेव गाव आहे. याच ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा ही पुतळा आहे.
गावातील प्राथमिक शाळेची स्थापना १९१८ साली झाली असून शाळेने ज्ञानदानाची १०० वर्षे पूर्ण केली आहेत. १९६४ साली शाळेच्या इमारतीचे उदघाटन तत्कालीन जि.प. अध्यक्ष श्री. शंकररावजी उरसळ व उपाध्यक्ष शिवाजीदादा काळे यांच्या हस्ते झाले होते.
सांस्कृतिक : मांजरवाडी गावाचा सांस्कृतिक वारसा स्वातंत्र्यपूर्व काळापासून राहिलेला आहे. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या लोकनाट्य तमाशा मंडळातील स्व. पांडुरंग मुळे यांनी कलेच्या माध्यमातून प्रबोधन आणि मनोरंजनाचे काम केले. बारीच्या माध्यमातून गावाची ओळख असली तरी वारीला ही तितकेच महत्व राहिले आहे. गावात महिनाभर सुरु असणारा काकडा, प्रवचन, किर्तन, यातून अखंड हरीनाम सप्ताहाची पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.
जुन्नर तालुक्याला मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यांचा आदर्श घालून देणारे गाव म्हणून मांजरवाडीची ओळख आहे. १९८९ पासून सुरु झालेली ही प्रथा आजही सुरु आहे. गावामध्ये सर्वच महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते. जगदंबा मातेचा यात्रोत्सव हा ग्रामस्थांसाठी आनंदाची व भक्तीची पर्वणी ठरतो. छबिना मिरवणूक, पारंपारिक लेझीम, कुस्त्यांचा आखाडा ही सांस्कृतिक ओळख आहे. गावामध्ये सर्व सण पारंपारिक पध्दतीने साजरे केले जातात. दिवाळी, नागपंचमी, बैलपोळा, दसरा गणपती उत्सव व गुढीपाडवा आनंददायी असतो. असा गावाचा सांस्कृतिक वारसा प्रेरणादायी आहे.
Historical Heritage: The neem tree standing in the middle of the road represents Manjarwadi village! It is the identity of the village in the surrounding area. Manjarwadi village carries a legacy of spirituality, devotion, historical faith, and patriotism. The village has the sacred temple of Jagdamba Mata. It also has traditional Maruti Temple and Vitthal-Rukmini Temple as its religious identity. Traditional martial Lezim is performed during Sherni, Palkhi, and Chhabina processions, passed down from ancestors to the youth. Villagers actively participate in Datta Jayanti, Hanuman Jayanti, Shri Ram Janmotsav, Shirdi Wari, and Alandi Wari with devotion. The tradition of Kakad Aarti has been followed for many years in the village.
During the freedom movement, the youth of the village contributed significantly. Inspired by Mahatma Gandhi, they participated in the Quit India Movement and the freedom struggle. After his demise, the villagers installed his full-size statue in the main square. Manjarwadi is the only village in North Pune district with a statue of Mahatma Gandhi. The village also has a statue of Chhatrapati Shivaji Maharaj.
The primary school of the village was established in 1918 and has completed 100 years of education. In 1964, the school building was inaugurated by then ZP President Shri Shankarraoji Ursal and Vice President Shivajidada Kale.
Cultural: The cultural heritage of Manjarwadi dates back to the pre-independence era. Artists like Tukaram Khedkar and Pandurang Mule contributed through folk drama (Tamasha) for social awareness and entertainment. While Bari tradition is significant, Wari also holds equal importance. The village celebrates a month-long Kakad, Pravachan, and Kirtan, completing 50 years of uninterrupted Harinam Saptah.
Manjarwadi is known as a model village in Junnar Taluka for organizing free community marriages since 1989. The tradition continues today. Birth and death anniversaries of great personalities are celebrated. The Jagdamba Mata festival is a spiritual and joyful occasion. Chhabina procession, traditional Lezim, and wrestling are key cultural identities. Festivals like Diwali, Nag Panchami, Bail Pola, Dussehra, Ganpati, and Gudi Padwa are celebrated traditionally. The cultural heritage of the village is truly inspiring.
ध्येय आणि दृष्टीकोन Mission & Vision
आमचे ध्येय Our Mission
गावाचा सर्वांगीण विकास करून प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे. To provide basic facilities to every citizen by ensuring the overall development of the village.
आमचा दृष्टीकोन Our Vision
मांजरवाडी गावाला स्वच्छ, सुशिक्षित आणि डिजिटल स्मार्ट व्हिलेज बनवणे. To make Manjarwadi village a clean, educated, and digitally smart village.
सार्वजनिक सेवा Public Service
नागरिकांना पारदर्शक आणि प्रभावी प्रशासन सेवा उपलब्ध करून देणे. To provide transparent and effective administrative services to citizens.
गावातील विकास उपक्रम Village Development Initiatives
वृक्षारोपण मोहिमा Tree Plantation Campaigns
जलसंधारण प्रकल्प Water Conservation Projects
डिजिटल ग्रामपंचायत सेवा Digital Grampanchayat Services
शिक्षण आणि आरोग्य उपक्रम Education and Health Initiatives