पुणे जिल्हा परिषद, पुणे
Pune Zilla Parishad, Pune
ग्रामपंचायत मांजरवाडी
Manjarwadi Gram Panchayat
ता. जुन्नर, जि. पुणे
Taluka Junnar, District Pune
वैयक्तिक व सार्वजनिक लाभांच्या योजना माहिती फलक
Information Board of Individual and Public Benefit Schemes
महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
Schemes Implemented Under Women and Child Welfare Department
वैयक्तिक लाभाचे योजनेचे नाव
Name of Individual Benefit Scheme
अनुसूचित जातीतील तसेच आदिवासी उपयोजनेंअंतर्गत (टीएसपी / ओटीएसपी) महिलांना वैयक्तिक लाभाच्या योजना (पिठ गिरणी, शिवण मशीन, मधुमक्षिका पालन संच)
Personal benefit schemes for women under Scheduled Caste and Tribal Sub-Plan (TSP / OTSP) such as Flour Mill, Sewing Machine, Beekeeping Kit.
लाभाचे स्वरूप
Nature of Benefit
विहित मापदंडाचे साहित्य खरेदी केल्यानंतर खरेदी समितीने निश्चित केलेल्या लाभाचे अनुदान
Subsidy is provided after purchasing the required equipment as per the approved standards and confirmation by the purchase committee.
विहित नमुन्यातील अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
Documents to be Submitted with Application
- ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याचा रहिवाशी दाखला
- ग्रामसभेमधून लाभार्थी निवड केलेला ठराव
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंब / कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.१,२०,०००/- पेक्षा जास्त नसल्याचे प्रमाणपत्र
- शिलाई मशीन प्रशिक्षण प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र
- यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसल्याबाबत ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
- अपंग लाभार्थी असल्यास ४०% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र
- आधार लिंक बँक खाते क्रमांक, बँक नाव, शाखा व IFSC कोड
- ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- स्वयंघोषणापत्र
- विज बिलाची प्रत
- Residence certificate of rural area
- Gram Sabha resolution for beneficiary selection
- Income certificate (annual income not exceeding ₹1,20,000)
- Sewing machine training certificate and caste certificate
- Certificate from Gram Panchayat stating the applicant has not taken benefit earlier
- Disability certificate (minimum 40% if applicable)
- Aadhaar linked bank account details with IFSC code
- Required documents for online application
- Self declaration
- Electricity bill copy